typing passage material
Typing passage | typing lessons | typing test paragraphs | Gcc Tbc typing test passage | Marathi typing | speed passage of Marathi typing 40 wpm
1.
कश्मीरच्या परिसरात वसलेले पहेलगाव. गावाला रस्ते किती असावेत, तर एकच. त्याचा दोहो तर्फांना घरे आहेत. या घरांना विशेष व्यक्तीमत्व असे काहिच नाहि. बैठी घरे, एकमजली, फार तर दूमजली. तळमजल्यावर दूकाने आणि दूकानाच्या मागे किंवा डोक्यावर घरसंसार.
घरांच्या एका रांगेमागे स्वप्नातल्या नदीच्या पाण्याइतके स्वच्छ असे पाणी घेऊन जाणारी लिदार नदी. हिच्या काठावर कूठे घाण नाहि. पण हि नदीच आहे. हिचे पाणी कूठे साचत नाहि. शेवाळी रंगाची साय कूठे धरत नाहि. आणि गाईगूरे हिच्यात डूंबत हि नाहि. हिला घाट नाहि. काठावर तीर्थ नाहि कि कूंड नाहि. पण हि आपली एक “प्यूअर” नदी आहे. कोणा देवाच्या जटेतून, अंगठ्यातून, कानातुन, यज्ञातून हि निघालेली नाहि. म्हणून ही फार फार पवित्र आहे. हिचा प्रवाह हा नावाप्रमाणेच जोरात वाहणारा तर आहेच पण हिचे पात्र शूध्द पाषाणांच्या चढउताराचे असल्यामूळे नेहमीच फेसाने डवरलेली असते. अनेक निर्झरणिंची व हिची गाठ पडते म्हणून हिला नदीपण प्राप्त होते. पण हिची चाल शेवटपर्यंत निर्झरिणीची आहे. उड्या मारल्या तरी कशा बेताने, हिला प्रपात आणि उत्पात ठाऊकच नाहित.
शूभ्र कबूतरे रांगेने बसली आणि नाजूकनाजूक उड्या मारीत रांगेने पूढे सरकली तर जशी दिसतील तसा दिसतो हा प्रवाह. ही हिमदूहिता पहेलगावासारखीच संभ्रमात आहे. आपण निर्झरिणी कि नदी हेही तिला नीटसे ठरविता आलेले नाहि. म्हणून तर हिचे पाणीहि भ्रमात फीरत असते. आपण अजून बर्फच आहोत असे त्याला वाटत असते. लिदारच्या गारव्यामूळे तिच्याशी कोणी फारशी सलग करायला जात नाहि.
2.
प्राचिन मंदिराच्या संकल्पनेची बैठक धर्म ही असली तरी सामाजिक जीवनाचा या मंदिरांशी घनिष्ठ संबंध आला. सभामंडपात नृत्य, गायन हे परमेश्वराच्या उपासनेचे साधन मानल्यामूळे निषिध्द नव्हते व यामूळे या कलांचा विकास होण्यास मदत झाली. याच सभामंडपात गावाच्या प्रश्नांची चर्चा होत असे. भजने किर्तने यासाठी लोक एकत्रित येत. तेव्हा देवळे हि धार्मिक, सामाजिक, कलासंस्कृती यांच्या हालचालीची केंद्रे बनतील हे महत्वाचे आहे.
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ जवळ तळ्याकाठचे शिवालय हे यादव काळातील एक उत्कृष्ट मंदिर समजले जाते. दोन चौकोनाच्या विशिष्ट मांडणीतून या मंदिराचा आकार आकर्षकरीत्या आकारलेला आहे. शिखराची रचना त्रिकाणी मनोऱ्यासारखी असून त्याच्या दोन मजली उंचीभोवती छोटेखानी वास्तू घटकांची योजना आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या खांबावरील तत्कपोशीवरील मती गूंग करणारी कलाकूसर होय.
नाशिकजवळ सिन्नर येथील गोदेश्वराचे मंदिर पातळीच्या चौथऱ्यवरुन डौलदारपणे उभे आहे. मूख्य मंदिराभोवती चार लहान मंदिरे असून प्रवेशद्वाराजवळ नंदी मंडप आहे. या मंदिराच्या वास्तूची उंची एकूण आकाराची व्याप्ती यांच्यात साधलेली प्रमाणबध्दता वैशिष्ट्यपूर्ण आहे.
हिंदू मंदिर वास्तूकलेचे सर्व संकेत झूगारुन देऊन जगातील एक आश्चर्यकारक कलात्मक अविष्काराचा निर्माण झालेला ठेवा म्हणजे वेरुळ येथील पर्वतापासून खोदून अलग केला.
3.
महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील एक सर्वात महत्वाचे महानगर मूंबई कोकणात आहे. एक नैसर्गिक बंदर व कापड गिरण्यांचे आहे. विविध प्रकारचे अभियांत्रिकी उद्योगधंदे, तेलशूध्दीकरण, औषधे व रसायने यांचे कारखाने येथे उभारलेले आहेत. रेल्वे व रस्ते वाहतूकिचे जाळे पसरलेले असून देशाच्या कानाकोपऱ्याशी याचा संपर्क साधलेला आहे. राष्ट्रिय आणि आंतरराष्ट्रिय विमानमार्ग यांचाही फायदा मुंबईला मिळत आहे. यामूळेच महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वात जास्त घनता मुंबई शहराची आहे.
उल्हास नदीच्या खोऱ्यात खालचा टप्पा आणि उत्तर रायगडमधील पनवेल भागात नागरीकरण मोठ्या प्रमाणात झालेले असून उद्योगधंदे उभारलेले आहेत. त्यामूळे ठाणे, कल्याण, उल्हासनगरसारखी महानगरेही उभारलेली आहेत. तेथेही अनेक औद्योगिक कारखाने उभारलेले आहेत. हा प्रदेश मूंबईजवळ असल्याने लोकसंख्येची वाढ जलद गतीने होत आहे.
ठाणे जिल्ह्याच्या अंतर्गत भाग वनांचा आणि आदिवासी लोकांचा विरळ लोकवस्तीचा आहे. दक्षिण कोकणात रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्याचा डोंगराळ व खडकाळ प्रदेश, कृषी उत्पनाची कमी क्षमता, लोकंची विशेषत:, तरुण वर्गाची मूंबईला स्थलांतरित होण्याची प्रवृत्ती ही कमी लोकसंख्याची काहि कारणे आहेत. सिंधूदूर्ग जिल्हा हा “पर्यटन जिल्हा” म्हणून जाहिर केलेला आहे. तसेच कोकण रेल्वेमूळे प्रदेशाचा विकास भविष्यात होऊ शकेल.
जळगाव जिल्ह्यामधील ठिबक सिंचन हे वैशिष्ट्य असून केळीसाठी प्रसिध्द आहे.
पाण्याची बचत करण्यासाठी कमीत कमी पाण्याचा उपयोग करणारी साधनसामग्री वापरण्यावर भर देणे हा उपाय आहे. नागरी क्षेत्रातील जनतेच्या सवयीमध्ये बदल करण्याच्या अवश्यकतेवरही भर दिला गेला आहे. सूदूर संवेदन तंत्रज्ञानापासून प्राप्त होणाऱ्या उपग्रह छायाचिात्राचा वापर राज्याची नैसर्गिक जडणघडण समजून घेण्यात अत्यंत उपयोगी ठरला आहे. भूमी उपयोग, मृदा सर्वेक्षण, भूजल पातळी, जमनीची उतार, खार जमीन मापन, दूष्काळ प्रवण क्षेत्र मापन, पाणलोट व्यवस्थापन अशा विविध बाबीचे अचूक आकलन करुन राज्याच्या नियोजनात मोलाचा वाटा आमच्या संस्थेने उचलला आहे.
पीक प्रेरणी व उत्पादनाचा अंदाज, नैसर्गिक आपत्ती समयी पीक नूकसानीचा अंदाज, व नूकसानग्रस्त शेतकऱ्याना शासकिय आर्थिक मदत वाटप, पाठ धारे क्षेत्रात रोखीच्या पिकांचा अभ्यास करुन शासनास योग्य अशी पाणीपट्टी वसूल करण्यास मदत करते. सुदूर सूवेदन व भौगोलिक माहिती प्रणाली हे तंत्रज्ञानच मूळात इतके प्रभावी आहे कि त्याचा सर्वच क्षेत्रात उपयोग करुन घेता येतो. उदा. सार्वजनिक बांधकाम विभागासाठी रस्त्याचे मापन कृषी विभागासाठी पीक परिस्थीती व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, भूजलसाठ्याचा शोध घेणे अशा अनेक विभागासांठी या तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे करण्यात आमची संस्था अग्रगण्य आहे. शेती पाणी, रस्ते, सिंचन, आरोग्य शिक्षण, पाणलोट विकास माहिती व तंत्रज्ञान सूप्रशासन अशा क्षेत्रात महाराष्ट्राची आगेकूच सूरुच आहे.
5.
माणसाचे मन मोठे अजब आहे. त्याच्याजवळ जे असते त्यांत त्याचे मन तृप्त नसते आणि त्याच्याजवळ जे नसते त्यासाठी ते मन आसूरलेले असते. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे, “पंख”. लहानपणी मी पऱ्यांच्या खूप कथा ऐकल्या होत्या, वाचल्या होत्या, या कथातील पऱ्याना पंख असत आणि त्या हव्या तेथे उडून जात असतं. माणसाला पंख असते तर माणूसही आपल्या मनाप्रमाणे स्वैर भराऱ्या मारु शकला असता.
इंग्लंडमध्ये विश्वचषक क्रिकेटचे सामने चालू होते, तेव्हा भारतातील प्रत्येक क्रिकेटशौकिनला वाटले असेल, मला पंख असते तर, आज मी उडत उडत इंग्लंडमध्ये गेलो असतो आणि एखाद्या झाडावर बसून हे सामने पहिले असते.
माणसाला पंख मिळाले तर त्याला वाहनाची गरज राहणार नाहि. मग प्रिमियर पद्मिनी, मारुती, सेन्ट्रो, मर्सिडीज अशा मोटारगाड्यांची मिजास उतरेल. गाड्यांची तिकिट खरेदी करण्यासाठी रांगा लावाव्या लागणार नाहित. विमानाची महागडी तिकिटे खरेदी करावी लागणार नाहित. आज जी वाहनाची गर्दी सर्वत्र होत आहे ती टळेल. मुंबई, कलकत्यासारख्या दाट लोकवस्तीच्या शहरांतील लोक तर पंख मिळाल्यावर खूप आनंदित होतील. कारण त्यांना रोज कामावर जाण्यासाठी जो त्रास, जी दगदग सहन करावी लागते ती टळेल. आपल्या पंखाच्या मदतीने ते उडत उडत आपल्या कामाच्या जागेवर वेळेवर पोचतील. रस्त्यावरील वाहनाची गर्दी टळल्यामूळे हवेतील प्रदूषणाचा धोका टळेल. त्यायोगे पर्यावरणाचे संतूलन राहिल. दूसराही एक मोठा फायदा होईल, तो म्हणजे, आपल्याला वाहनासाठी इंधनाची गरज राहणार नाही. मग इतर राष्ट्रांकडे आपल्याला भीक मागावी लागणार नाहि.
आपल्याला दररोज पाण्याची आवश्यकता असते. पिण्यासाठी, आंघोळीसाठी, कपडे व भांडी धूण्यासाठी, स्वयंपाकासाठी पाणी लागते. वनस्पतींना, पिकांना, पशूपक्ष्यांना आणि कारखान्यासाठी सूध्दा पाण्याची गरज असते. पाण्याची गरज भागवण्यासाठी आपण विहिरी, तलाव, नद्या धरणे, जलाशय, कालवे यांतील पाणी वापरतो. बागांसाठी जास्त पाणी लागते. उन्हाळ्यात तर आपल्याला पाण्याची वारंवार गरज भासते.
पावसाचे पाणी जमिनीवर पडते. त्यातील काहि वाहून जाते, तर काहि जमिनीत मूरते. विहिर खणली, कि जमिनीतील मुरलेले पाणी झऱ्यातून विहिरीत साठते. विहिरीतील पाणी आपण मोटेने किेंवा पंपाने उपसून काढतो. काही पंप विजेच्या मोटारीवर, तर काहि डिझेल इंजिनवर चालतात. पावसाचे पाणी खोलगट भागात साचते. खोलगट भाग मोठा असेल आणि त्याप खूप पाणी साठत असेल, तर त्याला “तलाव” म्हणतात. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या भागात खूप तलाव आहेत. नदीच्या एका काठापासून दूसऱ्या काठापर्यंत मातीचा व दगडाचा बांध घालतात. त्याला “बंधारा” म्हणतात.
मोठ्या नदीचे पाणी अडवण्यासाठी खूप मोठा बंधारा बांधावा लागतो. त्यासाठी दगड, माती, सिमेंट वापरतात. अशा मोठ्या बंधाऱ्याला “धरण” म्हणतात. धरणामूळे पाणी साचते व मोठा तलाव होतेा. त्याला “जलाशय” असे म्हणतात. जलाशयातील पाणी गरजेनूसार उपयोग करुन वीज निर्माण करतात.
7.
शासनाच्या शैक्षणिक धोरणानूसार प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सूधारण्यासाठी तसेच सर्वांना शिक्षणाची समान संधी प्राप्त करुन देण्यासाठी शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्यासाठी दर्जेदार शिक्षण व योग्य बूध्दीमत्तेसाठी निवड ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन इयत्ता चौथिची शिष्यवृत्ती / प्रमाणवृत्ती परिक्षा घेण्याचा मानस हाती घेतला आहे. चौथिच्या विद्यार्थीमध्ये किमान ज्या क्षमता विकसीत होणे आवश्यक आहे त्या झाल्या किंवा नाहि हे तपासणे हा परिक्षेमागील उद्देश आहे.
कारण इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतचा अभ्यासक्रम व पाठ्यक्रम हा क्षमता धिष्ठीत अभ्यासक्रम आहे. त्यानूसार अध्ययन, अध्यापन प्रकिया चालू आहे कि, नाहि आणि तो कितपत योग्य हे बघण्यास शासनाला या प्रमाणपत्र परिक्षेतून मदत होईल.
या परिक्षेत सर्वांत महत्व बुध्दीमत्ता चाचणीला व वास्तूनिष्ठतेला दिले आहे त्यातून योग्य मूल्यमापन करता येईल.
बूध्दीमत्ता हे सर्वव्यापी असलेले गूणवैशिष्ट्य आहे. प्रत्येक कार्यात तिचे अस्तित्व असते. बूध्दीमत्तेमूळेच विविध कामामध्ये समन्वय साधता येतो. कोणते काम आधी करावे, कोणते काम नंतर करावे. विविध कौशल्यामध्ये कशी सांगड घालावी हे बूध्दीमत्तेमूळेच शक्य होते. बूध्दीमत्तेमध्ये वस्तूंच्या वजनातील भेद ओळखणे, आवाजातील सूक्ष्म फरक ओळखणे, प्रतिक्रिया वेगाने देणे अशा कामाचा समावेश होतो.
काहि विचारवंतांनी बूध्दीच्या विविध व्याख्या केल्या आहेत.
8.
महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील एक सर्वात महत्वाचे महानगर मूंबई कोकणात आहे. एक नैसर्गिक बंदर व कापड गिरण्यांचे आहे. विविध प्रकारचे अभियांत्रिकी उद्योगधंदे, तेलशूध्दीकरण, औषधे व रसायने यांचे कारखाने येथे उभारलेले आहेत. रेल्वे व रस्ते वाहतूकिचे जाळे पसरलेले असून देशाच्या कानाकोपऱ्याशी याचा फायदा मूंबईला मिळत आहे. यामूळेच महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वात जास्त घनता मूंबई शहराची आहे.
उल्हास नदीच्या खोऱ्याचा खालचा टप्पा आणि उत्तर रायगडमधील पनवेल भागात नागरीकरण मोठ्या प्रमाणात झालेले असून उद्योगधंदे उभारलेले आहेत. त्यामूळे ठाणे, कल्याण, उल्हासनगरसारखी महानगरेही उभारलेली आहेत. तेथेहि अनेक औद्योगिक कारखाने उभारले आहेत. हा प्रदेश मुंबईजवळ असल्याने लोकसंख्येची वाढ जलद गतीने होत आहे.
ठाणे जिल्ह्याचा अंतर्गत भाग वनांचा आणि आदिवासी लोकांचा विरळ लोकवस्तीचा आहे. दक्षिण कोकणात रत्नागिरी व सिंधूदूर्ग जिल्ह्याचा डोंगराळ व खडकाळ प्रदेश, कृषी उत्पन्नाची कमी क्षमता, लोकांची विशेषत:, तरुण वर्गाची मुंबईला स्थलांतरीत होण्याची प्रवृत्ती ही कमी लोकसंख्येची काहि कारणे आहेत. सिंधूदूर्ग जिल्हा हा “पर्यटन जिल्हा” म्हणून जाहिर केलेला आहे. तसेच कोकण रेल्वेमूळे प्रदेशाचा विकास भविष्यात होऊ शकेल.
जळगाव जिल्ह्यामधील ठिबक सिंचन हे वैशिष्ट्य असून केळीसाठी प्रसिध्द आहे.
9.
सामाजिक-आर्थिक समता, शिक्षणाची समान संधी, सूजाण नागरिकत्व आणि लोकशाहि वर्तनपध्दतीचा व आधूनिक काळात अत्यावशक असलेल्या निरंतर शिक्षणाचा पाया, ह्या सर्व दृष्टिनी प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व जाणले पाहिजे. भारताच्या शिक्षणाच्या योजनेमध्ये प्राथमिक शिक्षणाला आजपावेतो पूरेसे स्थान मिळाले नाहि असे नाहि. पण योजनेचा रोख पटसंख्या वाढविण्याकडे अधिक वळल्याने प्राथमिक शिक्षणाच्या प्रवाहात येणारे प्रत्येक मूल खऱ्या अर्थाने प्राथमिक शिक्षण पूर्ण करुन बाहेर पडते कि नाहि याची पूरेशी दखल घेतली गेली नाहि. परिणामत: प्राथमिक शिक्षण पूर्ण न करता 77 टक्के मूले शाळे बाहेर जातात. ह्या प्रचंड गळतीमूळे, प्राथमिक शिक्षणाचा पटसंख्याधिष्ठित प्रसार हे केवळ कर्मकांड ठरते. असे आपापल्या जीवनाशी व भविष्यकाळाशी संदर्भ राखणारे व चांगल्या दर्जाचे शिक्षण पूर्ण करता आले तरच प्राथमिक शिक्षणाचा प्रसार झाला असे प्रामाणिकपणे म्हणता येईल. योग्य आश याच्या व दर्जाच्या प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण आणि आर्थिक विकास यांचा निकटचा संबंध असल्याचे सिद्ध् झाले आहे. विशेषत: मुलीना बहूसंख्येने दर्जेदार प्राथमिेक शिक्षणाचा लाभ मिळाल्यास आरोग्यनिरक्षण, लोकसंख्या नियोजन, शेतीतील व जोडधेद्यातील उत्पादन, तंत्रज्ञान व विज्ञानाचा प्रसार ह्या कार्यक्रमाना वेग येतो असे आढळले आहे. भारतातील प्राथमिक शिक्षणाची सद्य:स्थिती समाधानकारक नाहि असे केन्द्रीय मन्त्रालयाने केलेल्या विवेचनावरुन दिसते.
10.
शनिवारची रात्र म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्यावेळी जसा आनंदोत्सव साजरा केला तसेच काहिसे चित्र या रात्री पाहायला मिळाले. मुंबईपासून भारतातील सर्वच ठिकाणी उत्स्फुर्तपणे लोक रस्त्यावर येऊन भारताने विश्वकप जिंकल्याचा आनंदोत्सव साजरा करीत होते. क्रिकेट धर्माची आठवण या वेळी येत होती. श्रीमंत गरीब आणि धर्माची सारे जोखड फेकून क्रिकेटच्या खेळात एकजीव होऊन गेले होते. गेल्या काहि दिवसाची मंदिर, मशिद, गूरुद्वार, चर्च इथे चाललेल्या प्रार्थना यशस्वी झल्या होत्या. दहाव्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने श्रीलंकेवर सहा गडी राखुन तब्बल 28 वर्षानंतर विश्व विजयाचे स्वप्न साकार केले. या विजयाने भारत क्रिकेट विश्वात जगज्जेता ठरताा. हि बाब तमाम भारतीयांच्या दृष्टिने गर्वाची आणि तितकिच अभिमानास्पद ठरते. आठ वर्षापूर्वी भारताना हि संधी समीप आली होती. पण ते भांगलेले स्वप्न काल मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर प्रत्यक्षात उतरले. क्रिकेटच्या विश्वविक्रमवीर सचिन तेंडूलकर आणि सेहवागसारखे दिग्गज खेळाडू झटपट बाद झाले, परंतू गौतम गंभीर आणि कर्णधार धोनिच्या स्फोटक खेळीने विश्वचषकावर भरताचे नाव सूवर्णक्षरांनी कोरले आणि भारत क्रिकेटची महासत्ता म्हणून प्रस्थापित झाला.
ऑस्ट्रेलिया नंतर मोहालीत पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारताने अंतिम सामन्यात श्रीलंकेला पून्: विजश्री खेचून आणि कपीलदेव नंतर कॅप्टन धोनी विजयाचे हक्कदार झाले. हे खरे असले तरी विजयाचे शिल्पकार सचिन तेंडूलकर हेच ठरतात.
11.
माणसाच्या स्वभावाची फार मोठी गंमत असते. माणसाच्या मनात एक असते आणि तो माणूस हाताने कृती मात्र वेगळीच करत असतो. विंदा करंदीकरांनी आपल्या एका कवितेत मानवी मनाच्या या विचित्र वृत्तीचे मोठे मार्मिक वर्णन केले आहे. कधी हळूवार, मृदू असलेले मन कधी कधी क्रूर, निष्ठूर बनते. मन आणि मनगट यांत मात्र अंतर आहे. त्यामूळे काहि वेळेला मनात असूनही तशी कृती आपल्या हातून घडत नाहि आणि अशा वेळी प्रश्न उभा राहतो कि, मन श्रेष्ठ कि मनगट श्रेष्ठ.
मन म्हणजे भावना. काहि वेळेला माणूस जास्त भावनेशील होतो आणि मग त्याचे कर्तूत्व झाकोळून जाते. देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेणाऱ्या देशभक्तापूढे हा प्रश्न नेहमीच पडत होता, पण ध्येयप्राप्तीसाठी त्यांना भावनेवर मात करावी लागली. कारण “एकच तारा समोर आणि “पायताळी अंगार” अशा या क्रांतीकारकांनी काया सांगितले, “बांधू न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे. मन बाजूला ठेवून आपल्या मनगटाचा गौरव करणा-ऱ्या कित्येकाचे वागणे मात्र मनमानी असते. त्यांना आपल्या मनगटाच्चया सामर्थ्यांचा गर्व असतो. माझ्या मनगटात एवढे सामर्थ्य आहे कि मी इकडचे सर्व तिकडे करु शकतो. असा गर्व ते करु लागतात. मनगटाबद्दलच्या अशा अवास्तव अभिमानामूळेच तर क्रूर महायूध्दे खेळली गेली.
जो माणूस आपल्या मनाची आणि मनगटाची सांगड घालू शकतो तोच शहाणा. जे मनगटाच्या जोरावर साधता येत नसते ते मनाच्या सामर्थ्यांवर जिंकता येते.
12.
धर्माच्या कोणत्याही क्षेत्रात आपण नजर टाकली तर आपल्याला असेच दिसेल कि ज्ञानेश्वर, एकनाथृ, तूकाराम यांनी अत्यंत उदार व उदात्त उपदेश केला असूनही त्यातून सामाजिक धर्माची प्रेरणा कोणी घेतलीच नाहि. धनाचे दान हे धर्मदृष्टिने केवढे पूण्य आहे, श्रीमंतांनी गरीबांना दान द्यावे असा उपदेश पावलोपावली संतांनी केला आहे. पण येथल्या श्रीमंतानी दाने कशी दिली, त्यांनी मंदिरे बांधली, घाट बांधले, त्यांच्या व्यवस्थेसाठी जमिनी दिल्या, अन्नछत्रे घातली. त्यासाठी उत्पन्न नेमून दिली. पण रुग्णालयासाठी, अस्पृशांच्या उन्नतीसाठी कोणी दाने दिली नाहित. याचा अर्थ असा होतो कि, स्वत:च्या पारलौकिक कल्याणसाठी, पूण्यासाठी हि दाने दिली जात. त्या लोकांना दीनांची दया येत नसे असे नाहि, पण त्या दीनांची कायमची उन्नती व्हावी, या क्षणाला कळवळा येऊन आपण त्याला थोडे द्रव्य देण्याने त्याचा प्रश्न सूटत नाहि. तो सोडविण्याचा काहि प्रयत्न केला पाहिजे अशी भावनाच कोणाच्या चित्तात येथे उदित झाली नाहि. ती झाली असती तर आमूलाग्र क्रांती झाली असती.
पाश्चात समाज उ्त्कर्ष पावला तो त्या समाजाच्या धर्मबूध्दीला हे वळण मिळाले म्हणून. रॉकफेलर हे नाव आता जगप्रसिध्द झाले आहे. त्याने केलेले दान या प्रकारचे आहे. नवकोटनारायण हा शब्द त्याच्या वर्णनाला थिटा पडेल. अपार, अगणित संपत्ती एवढेच म्हणता येईल आणि तरीही त्या संपत्तीची कल्पना येणार नाहि. या संपत्तीचे काय करावे असा प्रश्न येताच तो तरुण वयातच सर्व व्यवसायातून निवृत्त झाला व आयूष्याची पूढील वर्ष संपत्ती दान करण्यात खर्च केली.
13.
मराठी साहित्याच्या क्षेत्रांत अनेक मूद्दांवर निकोप चर्चा होणे आवश्यक आहे. साहित्यीक कधीही एखाद्या माणसाचे, प्रांताचे प्रतिनिधित्व करीत नसतो. संत परंपरेपासून मराठी साहित्याने विश्वाचा विचार केला. आजच्या काळात देखील लेखकाचे साहित्य जात, धर्म, प्रांत या गोष्टी विचारात घेऊन वाचले जात नाहि. त्यावर लेखकाची लोकप्रियता किंवा साहित्यीक गूणवत्ता अवलंबून नसते. आपण एखादी ओळ लिहिली अथवा वाक्य उच्चारले तर त्याचा जगावर काय परिणाम होईल असा विचार करणाऱ्यांकडेच समाजाचे वैचारिक नूतृत्व जाते.
समाजातिल बहूसंख्याची दू:खे व अडचणी लवकर व चांगल्या पध्दतीने समजून घेण्याची क्षमता प्रतिभावंतांत असते. त्यामूळे अंधार पडला तरी अंधाराचे गाणे लिहिणारे जगप्रसिध्द साहित्यीक आपली मूद्रा विश्वावर उमटून जातात. लेखनाचा विषय कोणताहि असला तरी साहित्य आपल्याशी बोलते असे सामान्य माणसाला वाटावे लागते. या साहित्याचे नेतृत्व करणारे लोक वैचारिक संघर्ष करतात असा पूर्वानूभव आहे. साहित्याच्या क्षेत्रातही मानवी वृत्ती आणि जीवनसंघर्ष बाजूला पडून अनूउत्पादक विषयच नाचत राहिले तर त्यामूळे समाजाचे पाय मागे ओढले जातात. एखादा मुद्दा यूक्तीवादाने पटवून देणे वेगळे आणि संपूर्ण परिस्थिती समजून घेऊन समाजाविषयी आणि जीवनाविषयी आणि जीवनविषयी प्रगल्भ जाणिवा निर्माण करणे वेगळे, हे लक्षात घेतले पाहिजे. उगीच वाद नको हि पापभीरु भूमिकाहि टिकत नसते.
जे वाद सामाजिक अभिसरणाला उपयूक्त आहेत. त्यांची किमान खूली चर्चा करण्याऐवजी केवळ प्रचार करण्याचे लोकांचे शिक्षण होत नाहि असा अनूभव आपल्या समाजाला फार पुर्वीपासून शिक्षणाने दिला आहे.
Here you will get all type of typing material 🙂
ReplyDeleteplz add marathi 30 wpm paragrapgh also
ReplyDeleteplz add objective also
ReplyDeletevery nice
ReplyDeleteplz upload latter and statement also
ReplyDeleteHelpful paragraphs
ReplyDeletemast
ReplyDeletevery nice
ReplyDeleteplz uplod hindi lessons also
ReplyDeleteplease add some pdf also
ReplyDeletehello
ReplyDeletei am omkar gund
Wo darun oye passage da
ReplyDelete